Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती मध्ये येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात याव्या- शेख अब्दुल रहीम

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती मध्ये येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात याव्या- शेख अब्दुल रहीम

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती मध्ये येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात याव्या- शेख अब्दुल रहीम
X

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फ मा.संचालक-अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण पुणे यांना निवेदन सादर!

औरंगाबाद जिल्हा परिषद उर्दू शाळांना नवीन यु डायस कोड मिळाल्याने मागील (renewel) विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचीत राहण्याची शक्यता..?

औरंगाबाद -सद्या सर्व शाळा बंद आहे परंतु शिक्षण सुरू आहे या सोबत अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी अल्पसंख्याक प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती चे नवीन आणि नूतनीकरण चे कार्य सद्या पूर्ण महाराष्ट्र भरात सुरु आहे. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती चे फार्म भरतांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे की खालील येत असलेल्या समस्यां त्वरित सोडून सहकार्य करावे व जेणेकरून अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात भर द्यावा..

१) औरंगाबाद जिल्हा परिषद च्या उर्दू शाळांना नवीन व वेगळा यु डायस कोड मिळाला आहे म्हणून या वर्षी मागचे जे विद्यार्थी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेस परंतु या वर्षी नवीन यु डायस कोड मिळाल्याने सर्वांचे नवीन फार्म भरण्यात येत आहे यात जे विद्यार्थी मागील वर्षात शिष्यवृत्तीस पात्र होते किंवा अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती घेत आहे या परंतु या वर्षीपासून नवीन यु डायस कोड आल्याने विद्यार्थ्यांना या नवीन वर्षी नवीन फार्म भरत आहे आणि ते या वर्षी पात्र होईल याची काय खात्री असेल म्हणून जे विद्यार्थी renewal आहे त्यांना जुन्याच यु डायस कोड ने फार्म भरण्याची मुभा देण्यात यावी किंवा पर्यायी मार्ग काढण्यात यावा जेणेकरून जे विद्यार्थी मागील वर्षी शिष्यवृत्तीस पात्र झाला आहे त्याचे नुकसान होऊ नये व त्याला यावर्षी ही शिष्यवृत्ती मिळावी.

२) ही समस्या फक्त औरंगाबाद जिल्हा परिषद शाळेतील व जिल्ह्यातील उर्दू शाळेतली विद्यार्थ्यांसाठीच येत आहे. जे विद्यार्थी यावर्षी नवीन फार्म भरत आहे ते नवीन यु डायस कोड भरण्यास काही हरकत नाही याबाबत आपल्या स्तरावर मार्ग काढावे.

३) अल्पसंख्याक शिष्यवृत्ती ची साईट अति कमी वेगाने चालत आहे त्यात सुधारणा करावी.

४) बोनाफाईड ची अट काढून टाकावी.

५) सर्व अल्पसंख्याक समाजाच्या १००% विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी.

६)नवीन शाळा रजिस्ट्रेशन करतांना पासवर्ड यायला जास्त वेळ लागत आहे यात सुधारणा करण्यात यावी.

आपल्या स्तरावर लक्ष देऊन वरील सर्व बाबीवर त्वरित निर्णय घ्यावा ही योजना अधिक प्रभावीपणे कशी राबविता येईल यावर भर द्यावा अशी विनंती एका निवेदनाद्वारे मा.संचालक-अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण पुणे तसेच मा.शिक्षणधिकारी प्रा. व मा. आणि शिक्षणधिकारी निरंतर यांना एक एक प्रत देण्यात आली. ईमेल आणि व्हाट्सप्प द्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. निवेदनावर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, कार्याध्यक्ष शफिक पठाण, राज्य सचिव शेख शब्बीर आदींची स्वाक्षरी आहे.

Updated : 10 Sep 2020 4:57 PM GMT
Next Story
Share it
Top