अमरावती वल्स्टर मध्ये हेल्थकेअरच्या प्रशिक्षणार्थीच्या पालकांची पालक सभा
X
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
उषा पानसरेअसदपूर
आज दिनांक 7/9/2020 रोजी अमरावती क्लस्टर मध्ये हेल्थकेअरच्या प्रशिक्षणार्थींच्या पालकांची पालक सभा आयोजित केली होती ज्यामध्ये सुरवातीला रीना ढोक मॅडम प्रशिक्षक अमरावती क्लस्टर यांनी सूत्र संचलन केले. त्यानंतर अमरावती क्लस्टर हेड श्री भोजराज धोटे सर यांनी प्रास्ताविक केले ज्यामध्ये प्रथम संस्था सम्पूर्ण भारतात कश्या प्रकारे कार्य करत आहे हे आपल्या प्रास्ताविकात मांडले.त्यानंतर हेल्थकेअर चे प्रशिक्षण घेऊन होमकेअर मध्ये जॉब करणाऱ्या वर्षाताई बोंडे यांचे मनोगत त्यांनी सांगितले.
त्यानंतर विरेश सर प्लेस्मेंट समन्वयक नाशिक यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करून पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले व काही मुलींच्या केसस्टोरी सांगितल्या व मुलींना जॉब दरम्यानच्या काळात काय सुविधा मिळतील याबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रथमच्या हेल्थकेअर कार्यक्रम प्रमुख अनिताताई गांगुर्डे यांनी प्रशिक्षणार्थी व त्यांच्या पालकांसोबत प्रशिक्षण व जॉब याबद्दल चर्चात्मक मार्गदर्शन केले सोबतच प्रथमच्या ईपशीता मॅडम यांनी पण प्रशिक्षणार्थी सोबत हितगुज केले.शेवटी मुलींच्या पालकांचे प्रश्न यावर चर्चा करण्यात आली सदर पालक मिटिंग मध्ये रवींद्र त्रिभुवन सर मालेगाव श्रीमती जोशना मॅडम आर सी जे जे अमरावती श्रीमती उषाताई पानसरे पत्रकार अमरावती ,मंगेश साटोटे सर,प्रदीप झाडे सर,शिल्पा मॅडम राजु कांबळे सर उपस्थित होते या कॉल मध्ये एकूण 76 मुली व त्यांचे पालक उपस्थित होते.