Home > महाराष्ट्र राज्य > अन्वी जयस्वाल ही चिमुकली मोस्ट पॉप्युलर अवार्डने सन्मानित.

अन्वी जयस्वाल ही चिमुकली मोस्ट पॉप्युलर अवार्डने सन्मानित.

अन्वी जयस्वाल ही चिमुकली मोस्ट पॉप्युलर अवार्डने सन्मानित.
X

श्री क्षेत्रमाहूर /ता.प्र पदमा गि-हे

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेल्या लॉकडाऊन काळात मिळालेल्या फावल्या वेळेला सुवर्ण संधी समजून भारतीय वंशाच्या अमेरिकन रहिवासी असलेल्या डॉ.खुशबू जयस्वाल यांनी ऑनलाईन डांस स्पर्धा आयोजीत केली होती.त्यात 200 स्पर्धक सहभागी झाले होते. माहूर निवासी अभिषेक जयस्वाल यांच्या 7 वर्षीय अन्वीने ही या स्पर्धेत भाग घेवून सादर केलेल्या नृत्याला सर्वात जास्त म्हणजेच 106000 (एक लाख सहा हजार )प्रेक्षकांनी पसंती दर्शविल्याने आयोजकांनी स्मृतिचिन्ह,पदक व सन्मान पत्र देवून तिचा सन्मान केला आहे.

कु.अन्वी हिने निसर्गाच्या कुशीत असलेल्या मातृतीर्थ तलाव परिसरात आपली कला सादर करून ती आयोजन समितीच्या साइडवर अपलोड केली होती.तिला या कामी आजी कांचन,मोठे बाबा आशीष,मोठी आई दिव्या,पापा अभिषेक,आई ऐश्वर्या व भाऊ दिवेशने मोलाचे सहकार्य केले.शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे,भाजपाचे युवा नेते अॅड.रमण जायभाये,श्री रेणुकादेवीचे विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव,शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,शिवसेनेचे शहर प्रमुख निरधारी जाधव,युवासेनेचे तालुकाध्यक्ष विकास कपाटे,आशीष चारभाई,विनोद भारती,सुरेश आराध्ये,विकी तामखाने,संदीप गोरडे,बालाजी वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, द पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान,वसंत कपाटे,गजानन भारती, पद्मजा गिर्हे , राज ठाकूर, कार्तिक बेहेरे,राम दातीर,पवन कोंडे,सुरेश गिर्हे, राजू दराडे,जयंत गिर्हे, आदि मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated : 8 Sep 2020 1:22 PM GMT
Next Story
Share it
Top