Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > अतिवृष्टीने सिरोंचा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळविला..शेतकरी राजा झाला हवालदिल..

अतिवृष्टीने सिरोंचा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळविला..शेतकरी राजा झाला हवालदिल..

अतिवृष्टीने सिरोंचा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळविला..शेतकरी राजा झाला हवालदिल..
X

सिरोंचा विशेष प्रतिनिधी/रवि बारसागडी मो.9010477883

गडचिरोली/सिरोंचा :तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे तालुक्यातील ऐन बहरीनला आलेल जाफ्राबाद परीसरातील पिके अतिवष्टीमुळे नष्ट झाली आहेत.तोंडाशी आलेला खास हीरावला गेल्याने परीसरातील शेतकरी हीरमुसला झाला आहे.अतिवृष्टीने सिरोंचा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा तोंडचा घास पळविला तालुक्यातील परीसरातील जाफ्राबाद, टेकडा ताल्ला बोरमपली परीसरात अतिवष्टी झाली.यात या परीसरातील बहरलेली पिके धान व कापूस या पिकांचे मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे.या परीसरातील शेतकरी हवालदील झाले आहेत.याचा परीणाम अर्थव्यवस्थेवर पडू शकतो.आधीच कोरोना संसर्गामुळे जन सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. हात मजुरी करणाऱ्या लोकांवर उपास मारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थितीत शहरातील अनेक कंपन्या बंद पडल्या मुळे हजारो मजूर नोकरदार वर्ग गावाकडे परतला आहे .आणि गावकडील थोडी फार शेती करून उदरनिर्वाह करता येईल या आशेवर गावाकडे परतला आहे.आता परतीच्या पावसाने मात्र हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे...

Updated : 23 Oct 2020 2:49 PM GMT
Next Story
Share it
Top