Home > विदर्भ > अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा: धानोरा तालुका ग्रामसभा महासंघाची मागणी.

अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा: धानोरा तालुका ग्रामसभा महासंघाची मागणी.

अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा: धानोरा तालुका ग्रामसभा महासंघाची मागणी.
X

म मराठी न्यूज नेटवर्क

धानोरा प्रतिनिधी/ दिवाकर भोयर

धानोरा, दि.२०: धानोरा तालुका ग्रामसभा महासंघाची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीतअतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवून ति मजबूत करण्यासाठी चा ठराव घेण्यात आला.अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

संघटनेतर्फे पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. आमच्या आदिवासी गावा गावात संघटना सक्रिय आहेत. गावाने निर्णय घेऊन गावातील दारूबंदी पुर्णपणे बंद केली आहे. तालुक्यातिल अनेक गावे दारूविक्रीमुक्त आहेत. गावात दारूविक्री बंदी असल्याने गावात शांतता असते. अनेक महिलांचे कुटूंब उद्धवस्त होत होते.त्यापैकी काही खेड्यापाड्यातिल लोक, स्त्रिया, तरुण यांना अधिक फायदा झालेला आहे. दारूबंदीला आमचे पुर्न समर्थन आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीत उद्योगविरहीत अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकड वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी. अशी मागणी तालुका ग्रामसभा महासंघातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

Updated : 20 Oct 2020 1:34 PM GMT
Next Story
Share it
Top