अडीच वर्षांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या.
X
अडीच वर्षांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या.
खेमकुंड येथील घटना.संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
राळेगाव विशेष प्रतिनिधी,अमोल सांगानी
राळेगांव : घरगुती वादातून एका अडीच वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना वडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खेमकुंड येथे घडली.या प्रकरणी वडकी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे विरोधात गुन्हा नोंद केला.हि घटना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी तिन ते चार वाजता दरम्यान घडली आहे.
कु.देविका संतोष मुरखे ( अडीच वर्ष ) रा.खेमकुंड असं त्या निरपराध मृतक चिमुकलीचे नाव आहे.याबाबत वडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मुलीचे वडील संतोष नारायण मुरखे (३२) रा.खेमकुंड यांचा व या प्रकरणातील संशयित आरोपी बाळू मोतीराम मारेगामा (३४) रा.खेमकुंड यांचे घरगुती वाद सुरू होते.या वादातून संशयित आरोपीची पत्नी घर सोडून गेली होती.यावरुन मनात राग धरून ता.११ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी बाळू हा फिर्यादी संतोषला मारण्याकरीता संतोषच्या घरी गेला असता संतोष शेतात सोयाबीन काढणे करीता गेला असल्याने तो घरी मिळून आला नाही.मात्र फिर्यादी संतोषची मुलगी देविका ही घराच्या अंगणात खेळत असतांना आरोपीने आपला राग त्या निरागस चिमुकलीवर काढत संतोषला मारण्यासाठी आणलेल्या धारदार शस्त्राने (कटरने) त्या अडीच वर्षांच्या देविकाच्या गळ्यावर सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला.दरम्यान देविकाला उपचारासाठी पांढरकवडा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या घटनेची माहिती खेमकुंड येथील पोलीस पाटीलांनी वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांना देताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व आरोपीचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले.या प्रकरणी फिर्यादी संतोष मुरखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडकी पोलिसांंनी आरोपी विरोधात अ.प.क्र.२०४/२० कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे.या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडकीचे ठाणेदार विनायक जाधव करीत आहेत.