Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > अज्ञात व्यक्तीकडू वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या

अज्ञात व्यक्तीकडू वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या

अज्ञात व्यक्तीकडू वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या
X

वाडा:प्रतिनिधी

संजय लांडगे

वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कादिवली येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड आपटुन तिची हत्या केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

कादिवली येथे राहणारी वृद्ध महिला रखमाई धर्मा गवते (वय ६५) हिला जीवे ठार मारण्याच्या इराद्याने डोक्यात दगडाने वार करून अज्ञात व्यती पसार झाला आहे. रात्री उशिरा ही खबर पोलिसांना मिळाल्याने मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यामध्ये मध्ये भा.दं.वि.स. ३०२ व २०१ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करत आहेत.

Updated : 9 Sep 2020 9:02 PM GMT
Next Story
Share it
Top