Home > विदर्भ > अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार वितरण

अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार वितरण

अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार वितरण
X

महागांव (शरद गोभे)

आनंदाची पर्वणी व शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम. अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांनाiडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्त्य साधून डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या दिनांक 27/ 7 2020 रोजी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गौरव करण्यासाठी घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला होता. त्यानिमित्त त्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक ,तृतीय क्रमांक व सहभागी शिक्षक बंधू- भगिनी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मिलिंद कुबडे (प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ) व प्रमुख पाहुणे मा. दिपक चवणे (माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ) , मा. नितीन भालचक्र (अधिव्याख्याता, गणित विभाग प्रमुख), मा. दिपक मेश्राम ( अधिव्याख्याता, विज्ञान विभाग प्रमुख) मा. डॉ. राजेश डहाके गो सी गावंडे व निवड समितीचे सदस्य मा. ओमकार चेके, मा. राम राठोड, मा. महेश कुमार यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले याप्रसंगी मा. गजानन गोपेवाड( राज्य समन्वयक ) व मा. सौ जयश्री निलकंठ सिरसाटे (महिला राज्य समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे राज्यसमन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनीकेले.कार्यक्रममाचे आयोजक गजानन गोपेवाड राज्यसमन्वयक हे होते. प्रस्तावना सुवर्णा सातपुते जिल्हा समन्वयक, पुणे. तंत्रविभाग ऋतुजा कसबे जिल्हा समन्वयक मुंबई, आभारप्रदर्शन अश्विनी वास्कर जिल्हा समन्वयक यवतमाळ यांनी मानले.

कोविड19 च्या काळात आनलाइन पद्धतीने घेतलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात संपुर्ण राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 12:15 PM GMT
Next Story
Share it
Top