Home > विदर्भ > अखेर निर्मलाला मिळाले छत्र

अखेर निर्मलाला मिळाले छत्र

अखेर निर्मलाला मिळाले छत्र
X

अखेर निर्मलाला मिळाले छत्र

हेल्पिंग हँड्स संस्था व वर्गमित्रांचा पुढाकाराने बांधले नवीन घर

आशिष सुनतकर

उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

मो. 7030081037

अहेरी- निर्मला वर्गातील शांत,आज्ञाकारी व हुशार मुलगी! हलाखीची परिस्थीती असुनही शिक्षणाची कास तिने सोडली नाही.सर्व मुलांना अवघड वाटणार्‍या गणित ह्या विषयात निपुण होती. शिक्षणाची ओढ व अभ्यासाची जिद्द हीच तिची ओळख होती.इयत्ता १० वीत संपुर्ण शाळेतुन मुलींमधुन पहीली आली. पुढे तिच्या क्षमतेनुसार विज्ञान विषयात प्रवेश घेतला.नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच तिला मानसीक आजाराने घेरले.सुरुवातीला फारसा त्रास नसल्याने दुर्लक्ष झाले.नंतर ती गायब झाली.काही वर्षांनी गावात दिसली ती वेडसर अवस्थेतच.

छोट्या बाळाला घेऊन फिरणारी निर्मला तशा अवस्थेत दिसेल अशी कुणी कल्पनाही केली नाही.बाळाला क्षणभरही नजरे पासुन दुर होऊ न देता फिरतच असायची.बाळ थोडे मोठे झाल्यावर काहींनी शाळेत दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा विरोध होता.ते बाळच निर्मलाचा आधार आणि जगण्याचे कारण राहीले होते.परंतु बाळाला बोलणे शिकविणारं कोणीच नव्हतं.आईचे बोट पकडुन तो सुध्दा मुकाट्याने फिरायचा.

निर्मलाला तशा अवस्थेत तिच्या वर्गमित्र/मैत्रीणींना पाहावत नव्हतं.फारतर अन्नधान्य व कपडे देण्या शिवाय काहीच करता येत नव्हते.तिच्या आजारामुळे दिलेल्या वस्तु फार काळ टिकतही नव्हत्या.हळु हळु तिचा मुलगा मोठा झाला.आजु बाजुच्यांना बघुन स्वतःहुन बोलणे शिकला आणि परिस्थिती किंचीत बदलायला सुरुवात झाली.मात्र त्यांना राहण्याची सोय नव्हती.जिर्ण झालेली झोपडी जनावरांच्या खुराट्यापेक्षा निपटार झाली होती.निर्मलाच्या मुलाने तिच्या वर्गमित्रांसमोर व्यथा मांडली.दुरवर पसरलेल्या सर्व मित्र-मैत्रीणींनी मदत करायची तयारी दर्शवली परंतु मदत कशी करता येईल हा प्रश्न त्यांच्या पुढे होता.

हेल्पींग हँड्स बर्‍याच वर्षांपासुन निर्मलाला छोटी-मोठी मदत करत आहे हे त्यांना कळले.आणि हेल्पिंग हॅण्डस् निंर्मलाच्या घराच्या दुरस्तीच्या तयारीत आहे हे कळल्यानंतर वर्गमित्र परिवाराने छोटेसे का असेना एक नवीनच घर बांधु यात काय?अशी विचारणा केली व त्यासाठी यथाशक्ती मदतीची तयारीही दर्शवली.या आधीही हेल्पींग हॅण्डस् ने गरजुंना निवार्‍याची सोय केलेली आहे.आताही पुढाकार घेऊन काम पुर्णत्वास न्यायचे होते.हेल्पींग हँड्स आव्हान स्विकारले. हेल्पींग हँड्स च्या एका हाकेत अपेक्षीत रक्कम जमा झाली आणि सर्वांच्या मदतीने बघता बघता घराचे कामही सरसर होऊन गेले.

दिवाळीच्या शुभपर्वावर मात्र कोरोनाचे नियम लक्षात ठेवून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून निर्मलाला तिचे नवीन घर सुपूर्द करण्यात आले. सीआरपीएफ ३७ बटालियन अहेरी चे कमांडन्ट श्री श्रीराम मीना साहेब,रामरस मीना प्रतिष्ठित नागरिक डॉ.आय.एच.हकीम साहेब व वर्गमित्र प्रतिनिधी प्रभाकर श्रीरामवार च्या हस्ते उद्घाटन पार पाडून निर्मला व तिचा मुलगा बालाजीने आज नवीन घरात प्रवेश केला.यावेळी हेल्पींग हँड्स चे कार्यकर्ते प्रतीक मुधोळकर,संतोष मद्दीवार,नितीन दोंतुलवार,शंकर मगडीवार,शैलेंद्र पटवर्धन,पूर्वा दोंतुलवार,विवेक बेझलवार,ईसताक शेख वर्गमित्र डॉ.मनीष दोंतुलवार,रमेश चुक्कावार,अनिल चिलवेलवार आदी निर्मलासाठी तयार असलेले घर तिला व तिचा मुलगा बालाजीला सुपुर्द करतांना हेल्पिंग हँड्स चा व बालाजी चा आनंद गगनात मावेनासा होत आहे.

Updated : 27 Nov 2020 2:20 AM GMT
Next Story
Share it
Top