Home > विदर्भ > अखेर 'त्या' नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

अखेर 'त्या' नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

अखेर त्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
X

राजुरा । आनंदराव देठे (27 ऑक्टो.) : राजुरा तालुक्यातील राजुरा व विरुर स्टे. वनपरिक्षेत्रात वर्षभरापासून 'आर टी-1' वाघाने दहशत पसरवली होती. या नरभक्षी वाघाने वर्षभरात दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेत दोन इसमांना गंभीर केले होते. सदर 'आर टी-1' या नरभक्षी जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास सिंधी येथे रेल्वे रुळानजिक जंगलात कंपार्टमेंट क्रमांक 179 मध्ये पिंजऱ्यात कैद करण्यात आले.

सदर वाघाच्या धुमकुळाने परिसरातील शेतकरी व शेतमजूर दहशतीत होते. परिसरातील जनतेने वारंवार वनविभागाला जेरबंद करण्याकरिता अर्ज निवेदन देऊन विनंती केली होती. यामुळे वनविभाग या वाघाला जेरबंद करण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून मागावर होते. वनविभागातर्फे सदर वाघाला जेरबंद करण्याकरिता सात गस्तीपथक तयार करून ठिकठिकाणी कॅमेरे व ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अखेर आज वनविभागाला 'आर टी-1' वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. यामुळे वनविभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे आभार मानत परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Updated : 27 Oct 2020 7:53 PM GMT
Next Story
Share it
Top